Manipur Violence : आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा; खा. हिना गावित

Manipur Violence : आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा; खा. हिना गावित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा, अशी मागणी करत मणिपूर आणि पश्चिम बंगालमधील महिला अत्याचाराचा निषेध भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित यांनी केला. नंदुरबार येथे आज (दि.२३) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगलेले नसून ते निश्चित कठोरपणे न्याय करतील, असा विश्वास गावित यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी खासदार गावित म्हणाल्या की, "असल्या संताप जनक घटना घडवणारे आरोपी मनोविकृत आहेत. महिलांवरचे अत्याचार थांबवणे महत्त्वाचे आहे. पक्षीय राजकारण न करता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे केवळ भारतीय जनता पार्टीला लक्ष बनवण्याची संधी मानून संसदीय काम थांबवण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी हे सर्व थांबवले पाहिजे," असे गावित म्हणाल्या.

"संबंधीत आरोपींना पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही, अशा स्वरूपाची कठोरातील कठोर शिक्षा लवकरात लवकर दिली गेली पाहिजे. आदिवासी महिलांवर झालेला अत्याचार संताप करायला लावणारा असून संसद भवनात हा प्रश्न मांडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगल्याचा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. भाजपाला लक्ष बनवण्यासाठी या प्रकरणाचा वापर होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, सर्व विरोधी पक्षांना विनंती आहे की, महिला अत्याचाराच्या प्रश्नावर एकत्र यावे आणि संसदेचे कामकाज चालू द्यावे, असे आवाहन खासदार गावित यांनी विरोधकांना केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news