नंदुरबार : ऊसतोड कामगारांना ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन  | पुढारी

नंदुरबार : ऊसतोड कामगारांना ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन 

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

ऊसतोड कामगारांचे राहणीमान उंचावुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून विहित नमुन्यातील ओखळपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

राज्यातील ऊसतोड कामगांराचे व त्यांच्या कुटूंबाचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करण्यासाठी राहणीमान उंचावण्यासाठी ऊसतोड कामगांराना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून विहित नमुन्यातील ओखळपत्र प्राप्त करुन घ्यावे.

नोंदणीसाठी ऊसतोड कामगार हा मागील किमान 3 वर्षे किंवा जास्त कालावधीपासून ऊसतोडणीचे काम करणारा असावा. अशा ऊसतोड कामगारांना आपल्या ग्रामपंचायतीतून नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र प्राप्त केल्यानंतर ऊसतोड कामगांराना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे सुलभ होईल, असेही आयुक्त नांदगांवकर यांनी कळविले आहे.

हेही वाचा :

Back to top button