

पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ गणिततज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय ७९) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं आहे. गेले काही दिवस त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. पण आजार बळावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी या नात्याने मंगला नारळीकर यांची साथ लाभली.
मंगला राजवाडे हे त्यांचं मूळ नाव. गणितासारखा क्लिष्ट विषय सोपं करून समजावण्यात त्यांची हातोटी होती. विद्यार्थ्यांसाठीचे गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं ही त्यांची पुस्तकं विशेष गाजली.