नाशिक : देवळालीत बिबट्याचा धुमाकूळ, मध्यरात्री होतोय पाळीव प्राण्यांवर हल्ला | पुढारी

नाशिक : देवळालीत बिबट्याचा धुमाकूळ, मध्यरात्री होतोय पाळीव प्राण्यांवर हल्ला

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील सह्याद्रीनगर भागातील पाळीव कुत्र्यावर हल्ला करत फरफटत नेल्याची घटना घडली असून, लवकरच या भागात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या बाबत सविस्तर वृत असे की, लष्करी रेंजला लागून कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील वॉर्ड क्रमांक सातचा शिंगवेबहुला, चारणवाडीसह बाजूचा भाग ग्रामीण भागाला लागून येतो, त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर आढळून येतो. चारणवाडीजवळील जाधव, गावंडे वस्तीवर विठ्ठल गावंडे यांच्या घरातील व्हरांड्यात बसलेल्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने फरफटत नेल्याची घटना घडली असून, या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वाढला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button