पाथर्डी तालुका : स्थानिक संचालकामुळे ‘केदारेश्वर’ला कर्ज नामंजूर

पाथर्डी तालुका : स्थानिक संचालकामुळे ‘केदारेश्वर’ला कर्ज नामंजूर
Published on
Updated on

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सहकारी संस्थांमध्ये राजकारण करायचं नाही, ही शिकवण ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी आम्हाला घालून दिली. मात्र, गेल्या महिन्यात केदारेश्वर कारखान्याने जिल्हा बँकेला दिलेला सतरा कोटी रूपयांचा प्रस्ताव तालुक्यातील संचालकांनी विरोध केल्यामुळे फेटाळला, ही दुर्दैवी बाब आहे, असे प्रतिपादन केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी केले. तालुक्यातील टाकळीमानूर येथे संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखानाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऋषिकेश ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बाबासाहेब ढाकणे, माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, नवनियुक्त पोलिस उपनिरीक्षक मनीषा खेडकर, अर्जुन शिरसाट, भीमसेन खेडकर, मुसा शेख, मच्छिंद्र मानकर, संदीप शिंदे, कानिफ आंधळे, राहुल खेडकर, महादेव जायभाय, पिराजी शिरसाट, लक्ष्मण ठोंबरे, सतीश मुनोत आदी उपस्थित होते ढाकणे म्हणाले, आम्ही राजकारणात कधीही कुणाची वैयक्तिक शत्रुत्व धरलं नाही. या दोन तालुक्यांमध्ये परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे. ती यशस्वी करून दाखवीन.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून 'केदारेश्वर'ने आजपर्यंतची वाटचाल केली आहे. जिल्ह्यातील दोन-तीन कारखान्यांचा अपवाद वगळला तर, त्याच तुलनेत केदारेश्वरला आज कुणाचीही देणी नाहीत. सुरुवातीपासून जिल्हा बँकेने या संस्थेला पैसे देण्यास नकार दिला. आजही तीच परिस्थिती आहे.

मात्र, तरीही प्रतापराव ढाकणे यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून या संस्था व सभासद व ऊसउत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणाची तमा बाळगली नाही. यावेळी गहिनीनाथ शिरसाट, अजित शिरसाट, सतीश मुनोत, बाबासाहेब ढाकणे, नानासाहेब ढाकणे,अजित शिरसाट आदींची भाषणे झाली. राजेंद्र नागरे यांनी प्रास्ताविक केले. पी. यू. शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. भीमराव फुंदे यांनी आभार मानले.

पुन्हा रामराज्य आणणार : ढाकणे

ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांना टाकळीमानूर गटाने दिल्लीपर्यंत पाठविले. त्याची पुनरावृत्ती 2024 च्या निवडणुकीत टाकळीमानूरपासून सुरू करून प्रताप ढाकणेंना पुन्हा रामराज्य आणायचे आहे, असे ऋषिकेश ढाकणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news