निघोज : मळगंगा माता एक जागृत देवस्थान : अपर राज्यकर आयुक्त सुभाष एंगडे | पुढारी

निघोज : मळगंगा माता एक जागृत देवस्थान : अपर राज्यकर आयुक्त सुभाष एंगडे

निघोज(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवी हे राज्यातील जागृत देवस्थान असून, देवीचे दर्शन हा एक चांगला योग असल्याचे प्रतिपादन राज्याचे जीएसटी नाशिक विभागाचे अपर राज्यकर आयुक्त सुभाष एंगडे यांनी केले.
एंगडे यांनी नुकतीच निघोज येथील मंळगंगा देवीच्या मंदिराला भेट दिली. त्यांच्या समवेत अहमदनगरचे विक्रीकर अधिकारी दत्तात्रय गावडे, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ यांच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त गौरव वांढेकर, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, मुंबई बँकेचे अधिकारी सुनील पवार, सचिव शांताराम कळसकर, सहसचिव रामदास वरखडे, विश्वस्त बबनराव ससाणे, शिवबा संघटनेचे तालुकाध्यक्ष तसेच ट्रस्टचे विश्वस्त बबनराव तनपुरे, विश्वस्त शंकरराव लामखडे, बंटी लंके यांच्या हस्ते या अधिकार्‍यांचा तसेच त्यांच्या सहकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्वच अधिकार्‍यांनी ट्रस्ट, ग्रामपंचायत यांचे कौतुक केले. गाव व परिसर विकासासाठी सर्वांचा चांगला समन्वय असून, अशाप्रकारे लोकाभिमुख विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात पुढारी मंडळींचा समन्वय राहिल्यास गावचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. मळगंगा देवीचा नावलौकिक देशात होऊन हे एक जागतिक तीर्थक्षेत्र होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निघोजचे उपसरपंच व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त माऊली वरखडे यांनी ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती दिली. ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, सरपंच चित्राताई वराळ, सचिन वराळ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली गाव व परिसरात आमदार व खासदार यांच्या पाठपुराव्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. मळगंगा देवी तीर्थक्षेत्र व जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड परिसर पर्यटन माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांचा समन्वय मोठ्या प्रमाणात असल्याने गाव विकासाला गती मिळाली असल्याचे उपसरपंच माऊली वरखडे यांनी सांगितले.

हेही वाचा

चिचोंडी पाटील : शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांना जाग

अहमदनगर : जि.प. सोसायटी सभासदांसाठी आधारवड

अहमदनगर : झेडपीच्या 80 शाळांना डिजिटल संसाधने

Back to top button