नाशिक : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
त्यामध्ये विजय गांगुर्डे (प्रादेशिक व्यवस्थापक, जव्हार), अविनाश राठोड (उपप्रादेशिक व्यवस्थापक, शहापूर), आशिष वसावे (व्यवस्थापक, प्रशासन व विपणन, शहापूर), गुलाब सदगीर – प्रतवारीकार (उपप्रादेशिक कार्यालय, शहापूर ) यांचा समावेश आहे. संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्याचे भाजप आ. संजय केळकर, ॲड. पराग अळवणी यांनी या महामंडळातील घोटाळ्यावर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडत प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्याची मागणी केली होती. राज्य शासनाने बनसोड यांना चौकशी करण्याचे आदेश आले होते.
त्यानंतर बनसोड यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जव्हार, शहापूर या प्रादेशिक कार्यालयांमध्ये झालेल्या धान खरेदीत अनियमितता झाल्याचे समोर आले. त्यामुळे बनसोड यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
हेही वाचा :