कोकण रेल्वे : तुतारी एक्स्प्रेससह तीन गाड्या आज उशिरा धावणार | पुढारी

कोकण रेल्वे : तुतारी एक्स्प्रेससह तीन गाड्या आज उशिरा धावणार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी रोडदरम्यान देखभालीच्या कामासाठी दि. 21 जून रोजी सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेससह तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

रत्नागिरी ते सिंधुदुर्गातील वैभववाडी या सेक्शनमध्ये घेण्यात येणार्‍या मेगा ब्लॉकमुळे गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस ही 21 जून रोजी रोहा – रत्नागिरीदरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार आहे. दि. 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुअनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस उडुपी – कणकवली दरम्यान 3 तासांसाठी रोखून ठेवली जाणार आहे. याचबरोबर दि. दि. 21 जून रोजीची गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस ही सावंतवाडी रोड – कणकवली दरम्यान 30 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे रेल्वेच्या पूर्वनियोजित मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या तीन गाड्या या विलंबाने धावणार आहेत. मेगा ब्लॉकच्या कालावधीत कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणार्‍या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Back to top button