नाशिक : धुलाई गैरव्यवहार प्रकरणी ठेकेदार आज बाजू मांडणार | पुढारी

नाशिक : धुलाई गैरव्यवहार प्रकरणी ठेकेदार आज बाजू मांडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य विभाग रुग्णालयांमधील वस्त्र धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचे जादा बिल घेतल्याचे प्रकरण चौकशीतून समोर आले आहे. यासंदर्भात वस्त्र धुलाई करणाऱ्या ठेकेदाराला त्याची बाजू मांडण्यासाठी शुक्रवारी (दि. १६) सकाळी जिल्हा रुग्णालयात बोलावले आहे. त्यात ठेकेदाराचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.

ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ठेकेदाराने तीन वर्षांत ६७ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे रुग्णालयीन चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थाेरात यांनी नोटीस बजावून पैसेवसुलीचे आदेश दिले आहेत. बिलांमध्ये फेरफार करीत ६७ लाखांचे जादा बिल काढल्याचे आढळले आहे. त्यापैकी ३० लाखांचे बिल कंत्राटदारास देण्यात आले असून, उर्वरित ३७ लाखांचे बिल थांबवण्यात आले आहे. त्यामुळे जादा बिलाचे पैसे वसुलीसाठी संबंधित एजन्सीला नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीस उत्तर देताना ठेकेदाराने सांगितले की, कारवाई एकतर्फी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने संबंधित ठेकेदारास त्याचे म्हणणे मांडण्यास शुक्रवारी बोलावले आहे. त्यानुसार शुक्रवारी ठेकेदाराची बाजू ऐकून पुढील निर्णय होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button