नाशिक : मनमाड बाजार समितीच्या सभापतिपदाची आज निवड | पुढारी

नाशिक : मनमाड बाजार समितीच्या सभापतिपदाची आज निवड

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
बाजार समितीच्या सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि. 19) सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार असून, सभापतिपदी माजी आमदार संजय पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बाजार समितीत महाविकास आघाडीने 18 पैकी 12 जागा पटकावून स्पष्ट बहुमत मिळविले असून, सभापतिपदासाठी चार नावे चर्चेत असले तरी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे निर्णय घेणार आहेत. सभापतिपदासाठी माजी आमदार संजय पवार, ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, माजी सभापती गंगाधर बिडगर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड या चार सदस्यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, सभापतिपदी माजी आमदार संजय पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात मनमाड बाजार समितीअंतर्गत 19 गावे येतात. वर्षाला तब्बल 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल या बाजार समितीत होत असल्यामुळे राजकीयद़ृष्ट्या या बाजार समितीला जास्त महत्त्व आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध शिवसेना, भाजप युती अशी लढत झाली. युतीचे नेतृत्व आमदार सुहास कांदे, साईनाथ गिडगे, डॉ. संजय सांगळे आदींनी तर महाविकास आघाडीचे नेतृत्व माजी आमदार संजय पवार, पंकज भुजबळ आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, दीपक गोगड यांनी केले होते.

हेही वाचा:

Back to top button