Nashik : इगतपुरीजवळ रात्रीच्या वेळी युवकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी येथील तळेगाव जवळ असलेल्या सर्विस रोडवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन जणांच्या टोळक्याने कंपनी कामगाराच्या गळ्याला चाकू लावून लुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात नांदगावसदो येथील तीन संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहीत अशी की, गणेश दत्तात्रय मराडे, वय २३ वर्ष, रा. तळेगाव लालवाडी तहा युवक गोंदे दुमाला येथे कंपनीत कामाला आहे. कंपनीतून रात्री १२ वाजता तळेगाव येथे मोटार सायकलने घरी निघाला होता. मध्यरात्री पावने एक वाजेच्या सुमारास तळेगाव येथील सर्विस रोडवर टर्न मारला असता या रोडवर पुरुषोत्तम गिरी उर्फ गंगा, नागेष भागडे उर्फ चिमण्या, तुषार भागडे रा. नांदगाव सदो हे तीन तरुण मोटार सायकल रस्त्यात आडवी लावून उभे होते. गणेश मराडे याला पाहताच त्यांनी त्याच्या गळ्याला चाकू लावत धमकावत त्याच्या खिशातील रोख ४५०० रुपयांसह मोबाइल, गळ्यातील चांदीची चैन, ब्लुटुथ, घड्याळ असा एकुण २३ हजार ७०० रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने काढुन घेतला.
याबाबत गणेश मराडे यांच्या फिर्यादीवरून नांंदगाव सदो येथील पुरुषोत्तम गिरी उर्फ गंगा, नागेष भागडे उर्फ चिमण्या, तुशार भागडे या संशयितांविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उप निरीक्षक संदीप शिंदेसह पोलीस पथक करीत आहे.
हेही वाचा :