नाशिक : कोरोनातील अडथळा ठरला नोकरीसाठी दिशादर्शक! संधीचे केले सोने | पुढारी

नाशिक : कोरोनातील अडथळा ठरला नोकरीसाठी दिशादर्शक! संधीचे केले सोने

नाशिक (उगांव/ ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा
संकटात संधी येते असे नेहमी म्हटले जाते. समजदार व्यक्ती संकटातही खचून न जाता त्या संधीस अचुक हेरत पुढे जात असतो. त्याचप्रमाणे शिवडीतील श्वेता साबळे या युवतीने पोलिस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्याचबरोबर सैन्यदलातील देशसेवेच्या अनुभवाची शिदोरी अंगीकारत सेवानिवृत्तीनंतरही सेवा समर्पणासाठी पोलिस दलात सामिल होत प्रशांत कातकाडे या युवकानेही कर्तुत्वाची छाप पाडली आहे. दोघांच्याही यशस्वीतांचा सन्मान करत शिवडीकरांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

शिवडी येथील श्वेता साबळे हीने विज्ञान शाखेतील पदवीचे  शिक्षण घेतले. वडीलांची तुटपुंजी शेती अन् कोरोना काळात शेतमाल विक्री करतांना झालेली दमछाक याची देही याची डोळा बघितले. नोकरीत तेही पोलिस सेवेत उतरण्याचा निर्धार केला. आडगांव येथील संघर्ष करियर ॲकेडमीत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. चारचौघी मैत्रीणी जमून सामुदायिक खोली भाड्याने घेत जि्द्दीने अभ्यास केला. त्यामुळे भाईंदर येथील पोलिस दल भरतीत यश मिळाले. तिच्या प्रयत्नांना आई वडीलांचे पाठबळ मिळाले असल्याचे श्वेता साबळे आवर्जुन सांगते. सेवानिवृत्त सैनिक प्रशांत कातकाडे यानेही भारतीय सैन्यदलात राज्यस्थान पंजाब जम्मू काश्मीर, सिक्किम, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी सतरा वर्ष कर्तव्य बजावले. जुलै-२०१९ मध्ये सेवानिवृत झाले. शिवडी गावातील इतरही मुलांना प्रेरणा देण्यासाठी धावण्याचा सराव केला. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण करत घाटकोपर येथील रेल्वे पोलिस भरती परिक्षा दिली. कर्तव्यनिष्ठतेसाठी सज्ज होत सैन्यदलातील अनुभवाच्या जोरावर घाटकोपर रेल्वे पोलिस भरती परिक्षा उत्तीर्ण झाले. देशसेवेला प्राधान्य देण्याची इच्छा पुनश्च फलद्रुप झाल्याचे प्रशांत कातकाडे यांनी याप्रसंगी सांगितले. यानिमित्ताने दोघा यशस्वितांचा सत्कार शिवडी येथे सोसायटीचे सभागृहात करण्यात आला. याप्रसंगी शिवडी सोसायटीचे चेअरमन संदिप क्षीरसागर, व्हा. चेअरमन विजय सानप, माजी सरपंच गणपतराव क्षीरसागर, प्रमोद क्षीरगसार, सुधाकर क्षीरगसागर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. संचालक भिकाजी क्षीरसागर, रघुनाथ शिंदे, गजीराम क्षीरसागर, बाबाजी सानप, ॲड रामनाथ शिंदे, कैलास क्षीरसागर, लाला कातकाडे, बाळासाहेब क्षीरसागर, शांताराम क्षीरसागर, सुनिल साबळे, माजी उपसरपंच संजय शिंदे, भगिरथ आव्हाड, मंगेश सांगळे, धनंजय क्षीरसागर, नितिन क्षीरसागर, रोशन शिंदे, दिलिप शिंदे, सतिश सुर्यवंशी नानासाहेब  खेलुकर, नानासाहेब पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button