नाशिक : महागाईच्या विरोधात उद्धव ठाकरे गट रस्त्यावर | पुढारी

नाशिक : महागाईच्या विरोधात उद्धव ठाकरे गट रस्त्यावर

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीसह महागाईच्या विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) रस्त्यावर उतरली असून, आज (मंगळवार) एकात्मता चौकात गॅस सिलिंडर आडवे ठेवून रस्त्यावर चूल पेटवत आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मंडळ अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले.

सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्याच्या निषेधार्थ (उद्धव ठाकरे गट) शिवसेने आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, शहरप्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली एकात्मता चौकात महिला कार्यकर्त्यांनी चुली पेटवत आंदोलन केले. यावेळी धात्रक म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळात साडेतीनशे रुपयाला मिळणारे सिलिंडर आत थेट अकराशे रुपयांवर गेले आहे. पेट्रोल, डिझेल यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. वाढत्या महगाईला मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे, फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

त्यात गॅस सिलिंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली, तसेच आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी प्रवीण नाईक, संतोष बळीद, संजय कटारिया, श्रावण आढाव, सनी फसाटे, स्वराज देशमुख, अंकुश गवळी, रेणुका जयस्वाल, मुक्ता नलावडे, खालिद शेख, प्रमोद पाचोरकर, अनिल दराडे, किरण आहेर, लीलाबाई राऊत, गोटू केकाण, अमजद शेख, संजय सोळसे, योगेश परदेशी, रमेश हिरण यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button