Food : तब्बल 50 हजार रुपयांची ‘एक्झॉटिका गुजिया’! वाचा असं काय आहे खास... | पुढारी

Food : तब्बल 50 हजार रुपयांची ‘एक्झॉटिका गुजिया’! वाचा असं काय आहे खास...

लखनौ ः Food : बिहार आणि उत्तर प्रदेशात होळीच्या रंगोत्सवातील सर्वात खास खाद्यपदार्थ म्हणजे गुजिया. आपल्याकडील करंजीसारख्या या पदार्थात अनेक प्रकारचे सारण भरून विविध चवीचे प्रकार बनवले जात असतात. त्यांची बाजारातील किंमत 500 ते एक हजार रुपये प्रतिकिलो असते. मात्र, लखनौमध्ये सध्या 50 हजार रुपयांची गुजिया लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही जगातील सर्वात महागडी गुजिया ठरली आहे.

लखनौच्या सदर बाजारात छप्पन भोगचे दुकान आहे. याच ठिकाणी ही ‘एक्झॉटिका गुजिया’ मिळते. तिची किंमत आहे 50 हजार रुपये प्रतिकिलो. लक्झरी पॅकिंगमध्ये 20 गुजिया मिळतात. एक पीस 2500 रुपयांचा असतो. तेथील मॅनेजर रवींद्र गुप्ता यांनी सांगितले की ही गुजिया बनवण्यासाठी आम्ही इराणमधून मामरा बदाम, अमेरिकेतून ब्लू बेरी, अफगाणिस्तानातून पिस्ता, दक्षिण आफ्रिकेतून मॅकाडॉमिया नट, किन्नौरमधून पाईन नट, तुर्कीमधून हेजलनट आणि काश्मीरमधून केसर मागवतो.

ही सामग्री वापरून आमचे कुशल बल्लवाचार्य ही गुजिया बनवतात. आमच्याकडे पंधरा प्रकारच्या गुजिया बनवल्या जातात. केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर देश-विदेशात अनेक ठिकाणी त्या पाठवल्या जातात. या गुजियांवर 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावला जातो.

Satish Kaushik : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

पुणे : महिन्याला 300 कोटी सिगारेटचा ‘धुऑ’

Back to top button