धुळे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त भगवा सप्ताह

धुळे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त भगवा सप्ताह

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) महानगरवतीने दि. 23 ते 29. जानेवारी दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सावली वृध्दाश्रम येथे वयोवृद्ध नागरीकांना ब्लँकेट्स वाटप सुरूची भोजन, सर्व रोग निदान शिबीर, दंतरोग शिबीर, मोफत शिवभोजन, विद्यार्थींना शालेय साहित्य व खाऊचे वाटप , आधार नोंदणी व दुरुस्ती आदी शिबीरांचे आयोजन करण्यात आले.

सोमवार दि. 23 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हा कार्यालय, महानगरपालीका चौक, आझादनगर विभाग, बसस्थानक, मिल परिसर, देवपुर ,एकवीरा देवी रोड, शिवनेरी चौक , ग.न.6 आदी ठिकाणी प्रतिमापूजन झाले. तर महानगरपालिका इंग्रजी माध्यमाची शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे आयोजन उपमहानगरप्रमुख मच्छिंद्र निकम यांनी केले. तर चाळीसगावरोड येथील सावली वृध्दाश्रम येथे भोजन मोहाडी उपमहानगरप्रमुख विकास शिंगाउे यांच्या वतीने करण्यात आले. प्रतिमापूजन व कार्यक्रमास शिवसेना ग्रामीण सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आ.प्रा.शरद पाटील, भगवान करनकाळ, कैलास पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील , डाॅ. सुशील महाजन, राजेश पटवारी, गुलाब माळी, ललित माळी ,भरत मोरे माजी जिल्हाप्रमुख भूपेंद्र लहामगे, नरेंद्र परदेशी,रवी काकङ, प्रफुल्ल पाटील, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, गायत्री लगड, प्रतिभा सोनवणे, संदिप सुर्यवंशी, विनोद जगताप, आदींची या कार्यक्रमांना उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news