नाशिक : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीच्या घोषणेचा सिडकोत जल्लोष | पुढारी

नाशिक : शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीच्या घोषणेचा सिडकोत जल्लोष

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील आंबेडकर भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करताच सिडको पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांजवळ दोन्ही गटांनी एकत्र येत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी युवती सेनेच्या उपजिल्हाधिकारी किरण दराडे, सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे, माजी नगरसेवक भागवत आरोटे, वंचित आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे, शाखाप्रमुख विक्रांत सांगळे, ऋषी ताजणे, सुमित शिरसाठ, मदन ढेमसे, बालम शिरसाठ , प्रमोद जाचक, राजू गांगुर्डे आदींसह शिवसैनिक व भीमसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button