नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार | पुढारी

नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर अपघात, दुचाकीस्वार ठार

नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर घडली. शुभम रामगोपाल पांडे (२५, रा. महालक्ष्मीनगर, अंबड) असे या युवकाचे नाव आहे. तेजस भिकाजी राणे (२९, रा. कामटवाडे) याने पंचवटी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम हा एमएच १५ एफपी २२९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून शनिवारी (दि.८) सायंकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान, उड्डाणपुलावरून जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनचालकाने त्याच्याकडील वाहन भरदाव चालवत शुभमच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली.

या धडकेत दुचाकीवर बसलेला शुभम गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक तेजस राणे यास दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात चालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button