इचलकरंजी : गांजाविक्री करणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक | पुढारी

इचलकरंजी : गांजाविक्री करणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : येथे गांजाविक्री करणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. स्वप्नील रमेश निंबाळकर व ओमकार दिलीप पळसे (दोघे रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. अलायन्स हॉस्पिटलच्या पिछाडीस लायकर मळ्यात ही कारवाई झाली. या कारवाईमध्ये १ किलो १७७ ग्रॅम गांज्यासह एकूण ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याची माहिती पो. नि. महादेव वाघमोडे यांनी दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, अश्विन डुणूग, सागर चौगुले सुकुमार बरगाले, विजय माळवदे, पवन गुरव, सतीश कुंभार, सुनील बाईत आदींनी केली.

Back to top button