Gulabrao Patil : आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा, ठाकरेंचा पवार-गांधी यांच्या मिक्स विचारांचा

मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news
मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगाव : शिवसेनेतील फुटीनंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु, आमचा मेळावा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा असून ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा मेळावा असेल, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमचं नातं हिंदुत्वाशी आहे. त्यामुळे त्यांचे नात कोणाशी आहे? असा प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

जळगावात माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल!, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत. मधल्या काळात आम्ही हिंदुत्वाच्या विचार सोडून दुसऱ्या ट्रॅकला गेलो होतो. पण आता पुन्हा हिंदुत्वाच्या विचारांसाठी भगवा झेंडा आम्ही हाती घेतला आहे, असं म्हणत त्यांनी आपला अजेंडा स्पष्ट केला.

जुगार अड्ड्यावरूनही साधला निशाणा…
जळगाव शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावलेल्या मागील बाजूस जुगाराचा अड्डा सुरू असल्याचं उघड झालं आहे. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, 'कोणत्याही पक्षाचं कार्यालय हे न्याय देवतेचे कार्यालय असतं. त्यामुळे अशा ठिकाणी सट्टा अड्डा चालविणे ही निषेधार्ह बाब आहे. शिंदे गटातील ज्या महिला पदाधिकाऱ्याने सट्ट्याचा अड्डा उधळून लावला आहे, तिचं मी स्वागत करतो,' असं पाटील म्हणाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news