पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड | पुढारी

पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील खडरबारी गावाला रात्री वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे गावातील सुमारे २५ ते ३० घरांची पडझड झाली आहे तर ६ गुरे आणि अनेकजण जखमी झाले आहेत. यातील ६ जण गंभीर जखमी झाल्याने तातडीने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांच्या निवाऱ्याची आणि जेवणाची सोय गावातील मराठी शाळेत करण्यात आली आहे. वादळामुळे गावाकडे जाणारा रस्तावर वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ता  देखील बंद झाल्याने दळणवळणाची दैना झाली आहे.

रविवारी (दि.11) रात्री साडे नऊच्या सुमारास साक्री तालुक्यातील खरडबारी येथे वादळी वा-यासह पाऊस झाला. वादळामुळे गावातीलगावातील घरांची पडझड झाल्याने काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर जवळपास सर्वच घरांचे पत्रे उडाले असूल वादळी वाऱ्यामुळे गावाचा वीज पुरवठा देखील खंडीत झाल्याने काही ग्रामस्थांना अद्यापही अंधारात रहावे लागत आहे.

वादळामुळे मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ताच बंद झाल्याने गावाचा संपर्कही तुटला. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जेव्हा खरडबारीला आले तेव्हा रस्त्यावरील झाडे उचलून रस्ता सुरळीत करण्यात आला. वादळी पावसाची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, माजी खा. बापुसाहेब चौरे, आदिवासी बचाव अभियानाचे गणेश गावित, आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम गावित यांच्यासह अधिकाऱ्यांचा ताफा यावेळी पोहचला. यावेळी सुरेश पवार, मनोज सुर्यवंशी, नीलेश ठाकरे, अमोल ठाकरे, तुषार सुर्यवंशी, रवी गांगुर्डे, रोहिदास सूर्यवंशी, सयाजी चौरे, ज्ञानेश्वर गवळी, पोलीस पाटील पितांबर देशमुख यांनी नुकसानाची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान ग्रस्तांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन आ.मंजुळा गावित यांनी दिले आहे. यावेळी पेसा संघर्ष समितीचे बोरखीखडी, मालनगाव, वडखुट, कोडाईबारी येथील सदस्य उपस्थित होते. पावसादरम्यान मदतकार्य सुरु असतांनाच सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला होता. वीजपुरवठा खंडीतच दरम्यान खरडबारीसह परिसरातील मालणगाव बर्डीपाडा गावाचा वीजपुरवठा सायंकाळीही सुद्धा खंडीत होता. ठिकठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल असे वीज वितरण कंपनीने कळविले आहे.

तात्पुरते शाळेत निवाऱ्याची सोय
▪️तालुक्यातील खरडबारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार व वादळाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत आले आहे.
▪️पावसामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांनी नुकसानग्रस्त नागरिकांची गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
▪️अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आल्याने शासनाकडून तत्काळ मदत मिळावी यासाठी आ.गावित यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासनाची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
▪️आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी देखील खरड़बारी येथील नुकसानीबाबत माहिती घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करून शासनाकडून घरकुल मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button