पिंपरी : महिलेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार | पुढारी

पिंपरी : महिलेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार

पिंपरी : एका मेट्रोमोनीयल संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्तीने आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका महिलेकडून पैसे घेऊन तिची दहा लाखांची फसवणूक केली; तसेच लग्नाच्या आमिषाने तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. हा प्रकार मे 2022 ते 6 सप्टेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी येथे घडला. जावेद शफी काझी (34, रा. फोंडा, गोवा), महिला (55), शशीधर कुमार (26) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काझी याने फिर्यादींसोबत मे महिन्यात एका मेट्रोमोनीयल संकेतस्थळावरून ओळख केली. तो स्वतः मोठा व्यावसायिक असल्याचे भासवून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादींसोबत लग्न करणार असल्याचे आश्वासन देऊन त्याने हिंजवडी येथील एका लॉजवर फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर फिर्यादींसोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली. फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून व्यवसायात गरज असल्याचे सांगत फिर्यादीकडून ऑनलाईन माध्यमातून 12 लाख 75 हजार घेतले. त्यातील 2 लाख 75 हजार रुपये परत करून उर्वरित 10 लाख रुपये परत न करता फिर्यादीची फसवणूक केली.

Back to top button