एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दिलासा, संपत्तीवर ताबा मिळवण्याची कारवाई स्थगित | पुढारी

एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दिलासा, संपत्तीवर ताबा मिळवण्याची कारवाई स्थगित

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. खडसे यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा ताबा तातडीने सोडण्याचे आदेश ईडीने दिले होते. या विरोधात खडसेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर हायकोर्टाने खडसेंच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

ईडीचे उपसंचालक अमित भास्कर यांनी गेल्या आठवड्यात एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली होती. यात 10 दिवसांमध्ये जप्त केलेल्या सर्व मालमत्ता रिकाम्या करा, असे ईडीकडून बजावण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यातंर्गत 25 ऑगस्ट 2021 रोजी एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, इन्सिया मुर्तझा बदलावाला आणि उकानी यांच्या वैयक्तिक तसेच संयुक्त मालकीच्या 11 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. या मालमत्तेचे एकूण मूल्य 5 कोटी 75 लाख इतके आहे. यामध्ये लोणावळ्यातील बंगला, जळगावमधील 3 फ्लॅट आणि 3 मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे. ही मालमत्ता 10 दिवसांत खाली करावी, असे ईडीच्या नोटिशीमध्ये म्हटले होते.

हेही वाचा :

Back to top button