एमआयडीसी हद्दीतील महाळुंगे गोळीबारप्रकरणी दोघांना अटक | पुढारी

एमआयडीसी हद्दीतील महाळुंगे गोळीबारप्रकरणी दोघांना अटक

चाकण : पुढारी वृत्तसेवा

रिक्षाचा कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात सराईत गुंडाने मध्यस्थी करून धमकाविले. त्याचा बदला घेण्यासाठी पाच जणांनी मिळून गोळीबार केला. ही घटना दि. 2 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता चाकण एमआयडीसी हद्दीतील महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे घडली. त्यातील दोघांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली.

राहुल बाबासाहेब फलके (वय 28, रा. महाळुंगे, ता. खेड), अंकित अर्जुन थोरात (वय 28, रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव) अशी त्यांची नावे आहेत. वैभव अरुण गायकवाड यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोल्हापूर : निम्म्या जिल्ह्यात विधवा प्रथा बंद

पोलिसांनी दिलेेल्या माहितीनुसार, दि. 1 जून रोजी सायंकाळी महाळुंगे येथील अजय अरुण गायकवाड याचा मित्र संभाजी मोहन यमुनवाड याने सोन्या जावळे याच्या ड्रायव्हरला रिक्षाचा कट मारल्यावरून वाद घालत सोन्या जावळे आणि राहुल फलके यांना मारहाण केली. त्यामुळे राहुल फलके याने त्याच्या मित्रांसह अजय गायकवाड याला अद्दल घडविण्याचे ठरविले.

अजय गायकवाड हा वापरत असलेल्या कारमधून त्याचा भाऊ वैभव गायकवाड हा दि. 2 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता घरी जात होता. राहुल फलके आणि त्याच्या साथीदारांनी वैभवला अजय समजून गोळीबार केला. त्या वेळी कारच्या मागून येत असलेल्या संभाजी यमुनवाड याने ”वैभ्या पळ” असा आवाज दिला.

त्यामुळे हल्लेखोर घाबरून आपण ज्याच्यावर गोळीबार केला आहे, तो अजय गायकवाड नसल्याचे समजल्याने कारमधून पळून गेले. यातील दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

हेही वाचा 

कांद्याच्या भावात पुन्हा 200 रुपयांची घसरण; आखाती देशांतील स्थितीने शेतकरी अडचणीत

बारावी परीक्षेत पुणे विभागात सोलापूर अव्वल

बचतगटांनी उत्पादित वस्तूंचे ऑनलाईन मार्केटिंग करावे

 

Back to top button