नाशिक : बिबट्यासदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी

नाशिक : बिबट्यासदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी

नाशिक  (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा 

न्यायडोंगरी महसूल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या वनक्षेत्रामध्ये बिबट्या सदृश जंगली प्राण्याच्या हल्ल्यात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने न्यायडोंगरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, न्यायडोंगरीच्या वनक्षेत्रातून वाहणाऱ्या मन्याड नदी पात्रात वीज कडक्या नावाने ओळखला जाणारा जंगलाचा भाग असून या ठिकाणी आदिवासी समाजाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी महेश रावदास ठाकरे (११) व कृष्णा शिवदास ठाकरे (१२) हे दोघे तेथून थोड्या दूरवर असलेल्या नदी कपारी लगत खेळत असताना कपारीत दबा धरून बसलेल्या हिंसक प्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.  या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. प्रसंगी आरडा-ओरडा होताच जंगली प्राण्याने जंगलाकडे धूम ठोकली त्यामुळे दोघेही थोडक्यात बचावले.

जखमी मुलांना न्यायडोंगरी येथील डॉ. योगेश राठोड यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून पुढील उपचार सुरू आहे. सध्या परिसरात शेती मशागतीची कामे रात्रंदिवस सुरू असल्याने या हिंसक प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news