आमच्या हातात ईडी नाही पण….; संजय राऊतांचा भाजपला टोला | पुढारी

आमच्या हातात ईडी नाही पण....; संजय राऊतांचा भाजपला टोला

पुढारी ऑनलाईन : सहाव्या जागेसाठी भाजप इतर पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे अपक्ष व इतर पक्षातील आमदारांवर प्रलोभनं व दबावतंत्राचा वापर केला जात आहे. भाजपने त्यांचे पैसे वाया घालवू नये. तेच पैसे समाजकार्यासाठी वापरावेत. आमच्या हातात ईडी नाही पण अनुभव आहे, त्यामुळे चारही जागा मविआ जिंकणार असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. मुंबई येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यसभा निवडणुकीत मविआ ताकदीनं उतरणार असून चारही जागा मविआच जिंकणार आहे. भाजपकडून दबाव व प्रलोभने दिली जात आहेत. ज्यांच्यावर दबाव आणला जात आहे ते आमचे मित्र आहेत. त्यामुळे कशाप्रकारे दबाव आणला जातो याची माहिती रोज मिळत आहे. शिवाय यामुळे भाजपचं चरित्रदेखील उघड होत आहे. आमच्या हातात ईडी नाही पण अनुभव आहे. त्यामुळे चारही जागा मविआ जिंकणार असून भाजपने पैसे वाया घालवू नयेत असा खोचक सल्ला खासदार राऊत यांनी भाजपला दिला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button