जळगाव : चोपडा येथे लाचखोर ग्रामविकास अधिकारी जाळ्यात | पुढारी

जळगाव : चोपडा येथे लाचखोर ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

जळगाव : गटाराचे ढापे बांधण्याचे काम मंजूर करून त्याचे बिल अदा करण्यासाठी 11 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकार्‍याला रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी 15 व्या वित्त आयोगांतर्गत निधीतून गटार व ढापे बांधण्याचे काम पूर्ण केले. दरम्यान कामाचे बिल अदा होण्यासाठी चोपडा तालुक्यातील वर्डी येथील ग्रामविकास अधिकारी भगवान पांडुरंग यहिदे (रा. बोरवलेनगर, चोपडा) यांनी 12 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 11 हजार देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून 11 हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी यहिदे यास रंगेहाथ पकडले.

हेही वाचा :

Back to top button