नाशिक : जेव्हा बोहडा उत्सवात आमदार ठेका धरतात | पुढारी

नाशिक : जेव्हा बोहडा उत्सवात आमदार ठेका धरतात

नाशिक (दिंडोरी/ शिंदवड) : सचिन बस्ते

बोपेगावच्या बोहडा उत्सवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पांडवाची ताटी(मुखवटे)नाचवले.

दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे अक्षय तृतीयेपासून पारंपारिक बोहडा उत्सवास सुरुवात झाली आहे. शंभरपेक्षा अधिक काळापासून  परंपरा जपत असलेला हा उत्सव पाच वर्षाच्या खंडानंतर यंदा उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. सात दिवसाच्या या दैनंदिन कार्यक्रमात शनिवारी (दि.7) दिंडोरीचे आमदार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पांडवाचे मुखवटे आपल्या डोक्यात घालुन संबळवर ठेका धरत बोहडा उत्सवात उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. यावेळी बोपेगावकर झिरवाळ यांना खांद्यावर घेवून देखील नाचले.

हेही वाचा:

Back to top button