नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम | पुढारी

नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, शनिवारी (दि.16) पारा 37.6 अंश इतका नोंदविण्यात आला. वाढत्या उकाड्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या पार्‍याने चाळीशी गाठल्यानंतर पार्‍यात काहीअंशी घट झाली आहे. तरीही नाशिकचा पारा 37 अंशांपलीकडेच स्थिरावला आहे. सकाळी 10 पासून उन्हाच्या तीव— झळा बसत असल्याने सर्वसामान्य नाशिककरांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने रस्त्यांवर लॉकडाऊनसारखे चित्र पाहायला मिळते आहे. अंगाची लाहीलाही टाळण्यासाठी नागरिक शीतपेयांची मदत घेत आहेत. तसेच पंख्यासह एसी व कूलरची हवा घेत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातही चित्र वेगळे नाही. वाढत्या उष्णतेसोबत ग्रामीणमध्ये काही भागांत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना अक्षरश: पायपीट करावी लागते आहे. तर उन्हाचा पारा अधिक असल्याने शेतीची कामे पहाटे व सायंकाळनंतर उरकण्याकडे बळीराजाचा कल पाहायला मिळतो आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये पार्‍यात वाढ होऊन तो चाळीशी गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button