Headaches : जगातील 52 टक्के लोकसंख्येला डोकेदुखी

Headaches : जगातील 52 टक्के लोकसंख्येला डोकेदुखी

लंडन : डोके दुखणे ही एक अतिशय सामान्य अशी समस्या आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनात कधी ना कधी या समस्येचा सामना करावा लागलेला असू शकतो. अर्थात जगभरात असेही अनेक लोक आहेत ज्यांना नेहमी डोकेदुखीची गंभीर समस्या असते. अलीकडेच नॉवेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी अशा रुग्णांच्या डेटाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की जगातील 52 टक्के लोकसंख्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या डोकेदुखीची शिकार होते.

या डोकेदुखीमध्ये मायग्रेन, सामान्य डोकेदुखी, काळजीमुळे होणारी डोकेदुखी आदींचा समावेश आहे. वैज्ञानिकांनी याबाबतच्या संशोधनासाठी 1961 ते 2020 पर्यंतच्या डोकेदुखीविषयीच्या डेटाचा अभ्यास केला. जगभरातील 14 टक्के लोक मायग्रेनचे रुग्ण आहेत. तसेच 26 टक्के लोकांना इतकी चिंता असते की त्यामुळे डोकेदुखीचीही गंभीर समस्या निर्माण होते. जगभरात रोज 15.8 टक्के लोक डोकेदुखीचा सामना करतात.

संशोधनानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये प्रत्येक प्रकारच्या डोकेदुखीची समस्या अधिक असते. मायग्रेनचा विचार करता जगातील 17 टक्के महिला या समस्येच्या रुग्ण आहेत तर केवळ 8.5 टक्के पुरुष मायग्रेनच्या विळख्यात अडकतात. सुमारे 6 टक्के महिलांना सलग 15 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस डोकेदुखी राहते. पुरुषांमध्ये हे प्रमाणे केवळ 2.9 टक्के आहे.

कोल्हापुरात मतदारांनी भाजपला का नाकारलं ? | kolhapur elction 2022

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news