जळगाव: महागाई विरोधात युवासेनेचे थाळ्या वाजवत आंदोलन

थाळ्या वाजवत युवा सेनेचे आंदोलन,www.pudhari.news
थाळ्या वाजवत युवा सेनेचे आंदोलन,www.pudhari.news

जळगाव पुढारी वृत्तसेवा : जळगाव येथे युवासेनेच्या वतीने रोजच्या वाढत्या महागाई विरोधात थाळ्या वाजवत व अभिनंदन करत केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या नेतृत्वात हे आगळेवेगळे आंदोलन छेडण्यात आले.

देशात रोजच्या पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी यांसह इतर संसारोपयोगी साधनांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळून गेला आहे. रोजच्या वाढत्या महागाईमुळे जनता अतिशय चिंतेत आहे. तसेच या महागाईला आवर घालण्यासाठी केंद्र शासनातर्फे कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाहीये. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली असून जनतेच्या चिंतेत अधिकाधिक भर होतांना दिसत असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले.

रोजगारासंदर्भात कुठलेच ठोस निर्णय घेतले जात नसतांना वाढत्या महागाईमुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालेले आहे. याचअनुषंगाने पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी यांसह संसारोपयोगी साधनांचा वाढत्या महागाई विरोधात पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या नेतृत्वात पारोळा व एरंडोल येथील युवासेनेतर्फे केंद्र शासनाचे अभिनंदन करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी पारोळा व एरंडोल शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news