नाशिक : उपभूमीलेखचा उपअधीक्षक ४० हजारांची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : उपभूमीलेखचा उपअधीक्षक ४० हजारांची लाच घेताना जाळ्यात

नांदगांव : पुढारी वृत्तसेवा : नांदगाव येथील उपभूमीलेखा कार्यालयातील उपअधीक्षक विलास पांडुरंग दाणी यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दाणी यांना अटक करण्यात आली आहे.

दाणी यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीचे येणे करुन देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम त्यांच्या कॅबिनमध्ये स्वीकारताना दाणी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत विभागाने केलेल्या या कारवाईमुळे शासकिय विभागात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भूमिअभिलेखा कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात शेकडो तक्रारी करण्यात आल्या आहेत. आमदार सुहास कांदे यांनी आंदोलन छेडले होते. तरी देखील याची दखल घेण्यात आली नव्हती. अनेक नागरिकांची कामे रखडलेली आहेत. या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news