भंडारा : माझी वसुंधरा अभियान; २ हजार ४४५ सायकलींनी ‘असा’ रचला विक्रम

भंडारा : माझी वसुंधरा अभियान; २ हजार ४४५ सायकलींनी ‘असा’ रचला विक्रम
Published on
Updated on

भंडारा ; पुढारी वृत्‍तसेवा : माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज (मंगळवार) खात रोडवरील रेल्वे ग्राउंडवर आयोजित सायकल परेडला उदंड प्रतिसाद लाभला. शालेय विद्यार्थ्यांपासून तर गृहिणीपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी या परेडमध्ये उत्साहाने भाग घेतला. जिल्ह्यात आजपर्यंत घेण्यात आलेल्या सर्व सामूहिक उपक्रमांमधील विक्रमी उपस्थिती ठरलेला हा पहिला उपक्रम ठरला. या परेडसाठी २ हजार ४६२ नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर २ हजार ४४५ नागरिकांनी परेड पूर्ण केली.

परेडच्या सुरूवातीपूर्वी देशभक्तीपर गीतांसह एरोबिक्स तसेच झुंबावर व्यायाम प्रात्यक्षिकांनी उपस्थितांमध्ये चैतन्य पसरले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत माझी वसुंधरा अभियानांतर्गत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ उपस्थितांना दिली. यावेळी आमदार नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, विभागीय आयुक्त प्राजक्ता लंवगारे-वर्मा, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, सायकलपटू अमित समर्थ, सुनिता धोटे या सर्वांनी तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडून या परेडचा शुभारंभ केला.

बचत गटातील १८० महिलांनी उपस्थितांना टोप्या, पाणी व अल्पोपाहार वाटप केले. नेहरू युवा केंद्राच्या १६२ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. नगरसेविका बोरकर यांच्यासह आयोजक सह आयुक्त नगर पालिका प्रशासन चंदन पाटील, मुख्याधिकारी विनोद जाधव, भंडारा सायकल क्लबच्या वैशाली गोमकाळे यांनी परेड दरम्यान वेळोवेळी मार्गदर्शन केले.

या परेडची नोंद लिम्का बुकमध्ये होण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परेडचा विस्तृत व वस्तुनिष्ठ अहवाल निरीक्षक सादर करतील व त्याची पडताळणी करून एक ते दीड महिन्यानंतर लिम्का बुक नोंद घेणार आहे. यापूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ३ मार्च २०१९ रोजी झालेल्या सायकल परेडची नोंद आहे. ज्याचे अंतर ३.२ किलोमीटर होते तर १ हजार ३२७ सायकलपटूंनी परेडमध्ये भाग घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news