डॉ. योगेश सोमण : विचारांच्या लढाईसाठी विद्यार्थ्यांनी सज्ज रहावे, अभाविपच्या अधिवेशनात आवाहन | पुढारी

डॉ. योगेश सोमण : विचारांच्या लढाईसाठी विद्यार्थ्यांनी सज्ज रहावे, अभाविपच्या अधिवेशनात आवाहन

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा : मराठ्यांच्या अनेक पराक्रमांचे ईतिहास संकुचित केले गेले; असे सांगत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक प्राध्यापक डॉक्टर योगेश सोमण यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल नेटवर्कच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाचे विचार प्रसारित करण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन केले.

नंदुरबार येथे अभाविप चे ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन बाल हुतात्मा शिरिष कुमार नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिनांक १२ व १३ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाले. त्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अभाविप च्या ५६ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिनेअभिनेते  योगेश सोमण, अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, स्वागत समिती अध्यक्ष ईला गावित, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भय विसपुते, प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी प्रदेश मंत्री कु. अंकिता पवार, शहर मंत्री जयेश सोनवणे उपस्थित होते.

तर सभागृहातील प्रमुख रांगेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित, खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार राजेश पाडवी, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर कांतीलाल टाटीया आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिवेशनाचे स्वागत समिती अध्यक्ष ईलाताई गावित यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले. देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी यांनी सर्वांसमोर विद्यार्थी परिषदेच्या कार्याची व्याप्ती सांगत मार्गदर्शन केले. अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांनी विद्यार्थी परिषदेच्या आजतागायतच्या विविध कार्याचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. उद्घाटक राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान यांनी त्यांचे विद्यार्थी परिषदेतील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी जनजाती बांधवांचा गौरवशाली इतिहास आणि नव्याने घोषित झालेल्या जनजाती गौरव दिनासाठी विद्यार्थी परिषदेने घेतलेला पुढाकार यासाठी अभिनंदन केले. विद्यार्थी कसा असावा याचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना केले.

हेही वाचा :

Back to top button