Anterior staphyloma : तरुणीवर विनामूल्य यशस्वी शस्त्रक्रिया, कुटुंबाने मानले डॉक्टरांचे आभार | पुढारी

Anterior staphyloma : तरुणीवर विनामूल्य यशस्वी शस्त्रक्रिया, कुटुंबाने मानले डॉक्टरांचे आभार

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा :  साक्री तालुक्यातील पेरेजपुर या गावातील रहिवासी सरला भालचंद्र अहिरे (वय १८) या तरुणीचा उजवा डोळा गेल्या काही वर्षापासून बाहेर आलेला होता. त्या डोळ्यात अनटीरीयर स्टाफोलोमा (Anterior staphyloma) हा एक प्रकारचा कॅन्सर झालेला होता. खोबणीतून बाहेर आलेला या तरुणीचा डोळा पुन्हा खोबणीत बसविण्याची यशस्वी शत्रक्रिया धुळे येथे करण्यात आली.

तरुणीने आमदार मंजुळा गावित यांच्याकडे आपल्या डोळ्यांबाबत समस्या मांडली होती. त्यानुसार आ. मंजुळा गावित यांनी तरुणीला धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल होण्याचा सल्ला दिला. डॉ. मुकर्रम (Dr.Mukarram Khan) खान यांच्याशी संपर्क साधून या महिलेच्या डोळ्याच्या शत्रक्रियेबाबत विचारणा केली. त्यांच्या सल्यानुसार तरुणीच्या डोळ्यावर नुकतीच यशस्वी शत्रक्रिया पार पडली आहे. (Anterior staphyloma)

या प्रसंगी आ. मंजुळा गावित, जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ. तुळशीराम गावित, डॉ. अरुण मोरे (प्रभारी अधिष्ठाता) हे उपस्थित होते. तरुणीच्या डोळ्याचे ऑपरेशन डॉ. मुकर्रम खान, डॉ. वैशाली, डॉ. दीपाली गवई, डॉ. विजयश्री तोंडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्योतीकुमार बागुल, डॉ. अमिता रानडे या टीमने केले. त्यांना ओ.पी.डी. सिस्टर ज्योती वळवी, सत्येंद्र सोनगीरकर, राहुल वाघ, अजीत बागुल यांनी सहकार्य केले. तरुणीच्या डोळ्यांची विनामूल्य शस्त्रक्रिया करून दृष्टी मिळवून दिल्याबद्दल सरला अहिरे व तिच्या नातेवाईकांनी आ. मंजुळा गावित, डॉ. तुळशीराम गावित, डॉ. अरुण मोरे, डॉ. मुकर्रम खान व त्यांचे सहकारी यांचे आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button