नाशिकमधील खळबळजनक घटना; चिमकुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून आईवर बलात्कार
सातपूर, पुढारी वृत्तसेवा: छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना येथील राजवाडा परिसरात घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आझाद अख्तर शेख याने गेल्या शुक्रवारी (दि.17) रात्री 11ला पीडितेला चाकूचा धाक दाखवत व तिच्या लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देत पीडितेवर त्र्यंबक रोडवरील एका लॉजमध्ये बलात्कार केला. त्यानंतरही त्याने मित्राच्या घरी नेऊन पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर संशयित शेख रेल्वेचे तिकीट काढून पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र, सातपूर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्याम जाधव करीत आहेत.
हेही वाचलत का?

