नंदुरबार : भरारी पथकाकडून अवैध मद्यसाठ्यासह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नंदुरबार : भरारी पथकाकडून अवैध मद्यसाठ्यासह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार ; पुढारी वृत्‍तसेवा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर गुजरात सीमेलगत हॉटेल तापी परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत परराज्यातील विदेशी मद्याच्या कंटेनरसह 62 लाख 76 हजार 480 रुपयांचा मुददेमाल जप्त केला. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नंदुरबार अधीक्षक युवराज ठाकुर यांच्या मार्गदर्शनात महिनाभरात झालेली ही दुसरी धडक कारवाई आहे. तीन आठवड्यांपूर्वीच याच महामार्गावर राठोड यांनी 38 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.

नंदुरबार विभागातील अधीक्षक युवराज ठाकूर व निरीक्षक चकोर यांचे भरारी पथक सध्या ॲक्शन मोड मध्ये आल्याबद्दल विभागात कौतुक केले जात आहे.

, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नंदुरबार अधीक्षक युवराज ठाकुर यांनी या कारवाईसंदर्भात  माहिती देताना सांगितले की, 08 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप व (अं व द) राज्य उत्पादन शुल्कच्या संचालक श्रीमती वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक उत्पादन शुल्क नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या विभागाकडून देण्याात आलेल्या माहितीनुसार ब-हाणपूर-अंकलेश्वर रस्त्यावर हॉटेल तापी परिसर येथे पॅक बॉडी असलेला कंटेनर (क्रमांक GJ-15-AT-6007) ची तपासणी केली.

रराज्यातील विदेशी मद्याचे एकूण ४८८ बॉक्स

यावेळी परराज्यातील विदेशी मद्याचे एकूण ४८८ बॉक्स आढळले. वाहनासह मनोजकुमार मखनलाल बिश्नोई याला अटक करण्यात आली. परराज्यातील या विदेशी मद्याची एकुण (४८८ बॉक्स हरियाणा राज्य निर्मिती व विक्रीसाठी असलेले) किंमत ४४ लाख ७६ हजार ४८० रुपये इतकी आहे.

पॅकबॉडी कंटेनरसह एकुण ६२, ७६,४८० रुपयांचा मुद्‍देमाल जप्‍त करण्‍यात आला. डी.एम. चकोर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, पो.जे. मेहता दुय्यम निरीक्षक हंसराज चौधरी, हेमंत डी पाटील हितेश जेठे, अविनाश पाटील इत्यादींनी यशस्वीरीत्या पार पाडली. तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे  निरीक्षक डी. एम. चकोर करीत आहेत.

हेही वाचलं का? 

 

 

 

Back to top button