नाशिकमध्ये भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या | पुढारी

नाशिकमध्ये भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर परिसरात हत्येचे सत्र सुरूच असून. गेल्या चार दिवसात तब्बल तिसरी हत्या उघड झाली आहे. सातपूर भाजप मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांचा निर्घृन खून करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत म्हसोबा मंदिर येथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केली जात आहे. या हत्यासत्रामुळे शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.

नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. याची दखल घेत पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरातील अनेक पोलिस स्टेशनच्या प्रमुखाची कालच तडकाफडकी बदली केली आहे. शहरात हत्या, लूटमार, चेनस्नॅचिंग यासह सर्व प्रकारचे गुन्हे वाढत आहेत. राजकीय स्वार्थासाठी गुन्हेगारांची मदत घेतली जात असल्याचे बोलले जाते.

त्यातच गेल्या काही दिवसात शहरामध्ये हत्येच्या घटना समोर येत आहेत. आता सातपूरमध्येही एक हत्या झाली आहे. सातपूर भाजप मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे वृत्त समजताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांचा मोठा ताफा तैनात झाला आहे. हत्या कुणी, का व कशी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सातपूर पोलिस याचा तपास करीत आहेत. थोड्याच वेळात पोलिस याबाबत अधिक माहिती देणार असल्याचे समजते.

हे ही वाचा :

Back to top button