26/11 Mumbai Attack : शहिदांना वाहिली श्रद्धांजली | पुढारी

26/11 Mumbai Attack : शहिदांना वाहिली श्रद्धांजली

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची मुख्य राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (26/11 Mumbai Attack) आज १३ वर्षं पूर्ण झाली आहेत. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा हल्ला म्हणून त्याची नोंद झाली आहे. अत्यंत भयानक असा हा हल्ला होता. आजच्याच दिवशी २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातील १० दहशतवाद्यांनी समुद्र मार्गाने मुंबईत प्रवेश केला होता.

शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली

मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी या दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबारदेखील केला होता. त्यामध्ये १६६ लोकांचा आणि १८ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर कित्येक जण जखमी झालेले होते. या हल्ल्याला १३ वर्षं पूर्ण झाली म्हणून पोलीस आयुक्तालयात उभारलेल्या शहीद स्मारकामध्ये आज सकाळी ९ वाजता शहीद अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर गेट वे ऑफ इंडिया येथे या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांनाही श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि इतर मान्यवरही उपस्थित असणार आहेत. २६/११ हा (26/11 Mumbai Attack) दिवस देशासाठी अत्यंत दुःखाचा आहे. कारण, या हल्ल्यात शेकडो निरापराध लोकांचा, अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले.

…असा झाला २६/११ चा दहशतवादी हल्ला

या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रात्री ९.३० वाजता छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनसवर अंदाधूंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी एके ४७ मधून १५ मिनिटांत ५२ लोकांची हत्या केली. त्याचबरोबर १०० हून अधिक लोक जखमी झालेले होते. त्याच रात्री १०.३० मिनिटांनी पार्ले येथे एका टॅक्सीला बाॅम्बने उडविले. त्यानंतर १४ मिनिटांतच बोरीबंदर येथे आणखी एका टॅक्सीला बाॅम्बने उडविले, ज्यात २ दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर १५ लोक जखमी झाली. दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हाॅटेल, ओबेराॅय ट्राइडेंट हाॅटेल, नरिमन हाऊसमध्ये हल्ला केला. तिथेच भारतीय सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी २९ नोव्हेंबरच्या सकाळी ८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच अजमल कसाबला पोलिसांना अटक केली.

हे वाचलंत का?

Back to top button