विधान परिषद निवडणूक : भाजपकडून अमरिश पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

विधान परिषद निवडणूक : भाजपकडून अमरिश पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

धुळे पुढारी वृत्तसेवा

धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी आज भाजपतर्फे माजी मंत्री अमरिश पटेल यांचा उमेदवारी अर्ज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. त्यापूर्वी श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस येथे अनेक मान्यवर तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्वांनी मताधिक्यासाठी प्रयत्न करावेत : अमरिश पटेल

माजी मंत्री गिरीष महाजन म्हणाले, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अमरिश पटेल यांचे एकमेव नाव पक्षाकडे आले. दिल्ली येथून देखील पक्षाने त्‍यांच्‍या नावाला पसंती दिली. आपला विजय 100 टक्के नक्की आहे, सर्वांनी मताधिक्यासाठी प्रयत्न करावे. सर्व मतदारांना सोबत घेऊन आपण काम करावे, भाजपाची ताकद सर्वत्र वाढतेय व वाढवायचीय. अमरिश पटेल यांच्‍या कामाची पध्दत उत्कृष्ट आहे. ते सर्व पक्षाला घेऊन चालतात, असे त्यानी सांगितले.

यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, भाजपा कार्यकर्ते परिश्रमातून पुढे आले आहेत, अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. विधान परिषदेत अमरिश पटेल यांच्यासारखे तज्ज्ञ व्यक्तीची गरज आहे. त्‍यांनी शिक्षण, राजकीय व सर्वच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक निवडणूक होईल. धुळे नंदुरबार दोन्ही जिल्ह्यात सर्व नेते यांच्यात स्नेहभाव आज देखील आहे.
डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, सर्वपक्षीय अमरिश पटेल यांचे मित्र आहेत. त्यांचे सर्वच क्षेत्रात कार्य मोठे आहे. त्यांचे कार्य उज्ज्वल आहे. त्यांना सर्व पक्ष मानतात.

माजी मंत्री अमरिश पटेल म्हणाले, भाजप हा विचारधारा असलेला पक्ष आहे. सार्वजनिक जीवनात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. दोन्ही जिल्ह्यात विकासकामे करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे. एक परिवार म्हणून आपण काम करु या.

खा. डॉ. हिनाताई गावित म्हणाल्या, अमरिश पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. 2 वर्षे बाकी असतांना त्‍यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, 0पोटनिवडणूक लढवून ते पुन्हा विजयी झाले. शिस्तप्रिय अमरिश पटेल हे सर्वांना घेऊन चालतात, ही अभिमानाची बाब आहे.

खा. डॉ. सुभाष भामरे म्हणाले, भाईंनी भाजपा मध्ये प्रवेश केला आपण सर्व जण भाग्यवान आहोत. भाई तुमचाच विजय पक्का आहे, आपणांस सर्व पक्षात आदर आहे. भाई महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून येतील.  धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे महापौर प्रदीप कर्पे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करून भाईंना पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

हेही वाचलं का?

 

Back to top button