‘लॉकअप’ मधून पळालेला आरोपी तब्बल बारा वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

'लॉकअप' मधून पळालेला आरोपी तब्बल बारा वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

वाई बाजार (नांदेड) ; पुढारी वृत्तसेवा : ‘लॉकअप’ मधून पळालेला आरोपी तब्बल बारा वर्षांनी सिंदखेड पोलीसांच्या जाळ्यात सापडला आहे. मोटार सायकल चोरी प्रकरणातील ‘लॉकअप’ मधून पळालेला संशयित आरोपी तब्बल बारा वर्षांनी सिंदखेड पोलिसांच्या हाती लागला आहे. या आरोपीस माहूर न्यायालयाने पंधरा दिवसाची सजा सुनावली आहे.

एका मोटार सायकल चोरीच्या प्रकरणात सिंदखेड पोलिस ठाण्यात २००८ साली शिवाजी भानुदास शितोळे (वय ४०) हा संशयित आरोपी होता.

अधिक वाचा : 

आरोपीस सिंदखेड पोलीसांनी अटक केल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडी देण्यात आली होती.

यावेळी आरोपी शिवाजी शितोळे हा पोलीसांच्या लॉकअप मधून मोठ्या शिताफीने गायब झाला होता.

मागील बारा वर्षांपासून सिंदखेड पोलिसांना स्वत:च्या मागे पळवत शितोळे पळवत होता.

अधिक वाचा :

शिवाजी हा तब्बल तब्बल बारा वर्षांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे राहत असल्याची गोपनीय माहीती सिंदखेड पोलीसांना मिळाली.

सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक भालचंद्र तिडके यांच्यासह काँन्सटेबल पठाण, सानप, पोलिस नाईक कुमरे, पोलिस काँन्सटेबल मोकले, गजानन नंदगावे आदी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आर्णी येथे सापळा रचला होता.

अधिक वाचा : 

आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान (ता. १२) जुलै रोजी सदर आरोपीस माहूरच्या प्रथमवर्ग न्यायालयासमक्ष उभे केले.

न्यायालयाने सदर आरोपीस पंधरा दिवसाची सजा सुनावली आहे. सदर आरोपीस योग्य बंदोबस्तात जिल्हा कारागृह नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

Back to top button