

तालुक्यातील करंजी येथील भावले वस्तीवर दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यात एक महिला गंभीर जखमी आहे. गोपीनाथ लक्ष्मण भावले असे दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले या गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पाथर्डी पोलीस घटनास्थळी असून, पोलीस अधीक्षकदेखील घटनास्थळी गेले आहेत. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.
दरोडेखोरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.