नगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग; १० रुग्णांचा मृत्यू

नगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग; १० रुग्णांचा मृत्यू
Published on
Updated on

येथील नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शनिवारी सकाळी आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते २० रुग्ण गंभीर जखमी झाल्याचे समजते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. ते सर्व कोरोनाबाधित होते. शॉर्टसर्किटमुळे आयसीयूत आग लागली. यामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रामकिसन हरगुडे ,सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचौरे, कडूबाई गंगाधर खाटीक, शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद, दीपक विश्‍वनाथ जडगुळे तसेच एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत.

नगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दलाने तसेच एमआयडीसी आणि लष्कराच्या दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, आग लागल्यावर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढले. अत्यवस्थ रुग्णांना इतर कक्षात स्थलांतरित करण्यात आले. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि बचावकार्यास वेग दिला. आगीमुळे रुग्णालयातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आदींसह अनेकांनी घटनास्थळ धाव घेतली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news