राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती, धुळयात काँग्रेस पदाधिकार्‍यांचा जल्लोष | पुढारी

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती, धुळयात काँग्रेस पदाधिकार्‍यांचा जल्लोष

धुळे : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने धुळे जिल्हा शहर काँग्रेसच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून काँग्रेस विजयाच्या घोषणा दिल्या.

गुजरात न्यायालयाने खा. राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने राहूल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली जाणार आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्याने महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यातील काँग्रेस भवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

काँग्रेस आणि राहूल गांधी यांच्या विजयाच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला होता. यावेळी धुळे शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.अनिल भामरे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, काँग्रेस महिला अध्यक्षा गायत्री जयस्वाल, ज्येष्ठ नेते पितांबर महाले, जि.प.सदस्य अरुण पाटील, किरण नगराळे, संचालक बापू खैरनार, राजेंद्र खैरनार, रविंद्र पाटील, वाल्मिक वाघ, मुस्तुक, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नाविद शेख, समलान शेख, फुरकान शेख, शब्बीर पिंजारी, सलमान मिर्झा, इदवान अन्सारी आदी कार्यकर्ते आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button