अमित शहा आज पुणे दौर्‍यावर | पुढारी

अमित शहा आज पुणे दौर्‍यावर

पुणे : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा हे शनिवारी (दि. 5) पुणे दौर्‍यावर येत आहेत. रविवारी (दि. 6) ते चिंचवड येथे होणार्‍या बहुराज्यीय सहकार संस्थांसाठीच्या पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. यानिमित्त सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह काही महत्त्वपूर्ण राजकीय गाठीभेटी व विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहा हे पुण्यात शनिवारी रात्री पुण्यात मुक्कामी येत आहेत. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांचे स्वागत करतील. रविवारी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे बहुउद्देशीय हॉलमध्ये दुपारी 12 वाजता केंद्राने मल्टिस्टेट सहकारी संस्थांसाठी विकसित केलेल्या एकात्मिक पोर्टलचे शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील बहुराज्यीय सहकारी संस्थांचे पदाधिकारी (मल्टिस्टेट) आणि साखर महासंघ व सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसह सुमारे दीड हजार सदस्य या वेळी उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर रविवारीच सायंकाळी ते पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत.

हेही वाचा

‘ग्रेट बॅरियर रीफ’च्या रक्षणाबाबत ‘युनेस्को’ला आशा

कोल्हापूर : गणेशमूर्तींसाठीच्या रंगांची बाजारपेठ 25 कोटींची

’झटपट वीज कनेक्शन’चा आठ हजार ग्राहकांना लाभ

Back to top button