इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो चौफुलीवर इगतपुरी शहराकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या दुर्गा वाळू झूगरे (रा. वाकडपाडा) या आदिवासी महिलेस मुंबई आग्रा महामार्गावरच प्रसूती कळा सुरु झाल्या. या महिलेने महामार्गावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
दुर्गा झुगरे या रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात त्यांना प्रसुती कळा सुरु झाल्या. यावेळी जवळच उभे असलेले घोटी टोल नाक्यावरील ग्रुप पेट्रोलिंगच कंट्रोल रूम ऑफिसर समीर चौधरी, गुलाब गवळी, चालक नारायण वळकंदे यांनी यांनी त्यांची अवस्था पाहून तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र तत्पूर्वीच या महिलेने महामार्गावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला.
रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी यानंतर महिलेसह तिच्या बाळाला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले. आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित असल्याने सोबत असलेल्या नातेवाईकांनी या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्री सदो फाट्यावरून ही आदिवासी महिला नातेवाईकांसोबत इगतपुरी शहराकडे चालली होती. पिंप्रीसदो चौफुलीवर रिक्षाची वाट बघत असताना तिला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिला मदत करण्याच्या आधीच तिने तिथेच एका गोंडस बाळाला जन्म दिला. माता आणि बाळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात सुरक्षित असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सुशांत श्रीवास्तव व परिचारीका सुमन पगारे यांनी दिली.
हेही वाचा :