पिंपरी : पालखी सोहळ्यामुळे मटण, चिकन, मासे विक्री दोन दिवस बंद | पुढारी

पिंपरी : पालखी सोहळ्यामुळे मटण, चिकन, मासे विक्री दोन दिवस बंद

पिंपरी : आषाढी वारीमुळे जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी रविवारी (दि.11) शहरात येत आहे. दुसर्‍या दिवशी सोमवारी (दि.12) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी शहरातून जाणार आहे. या दोन दिवसांत शहरात मटन, चिकन, मासे व मासळी विक्रीची दुकाने बंद राहतील. शहरात दोन दिवस पालखी सोहळा असल्याने लाखो भाविक व नागरिक उपस्थित असणार आहेत.

या दोन दिवसांचे कालावधीमध्ये वारकरी संप्रदायाचे पावित्र्य राखण्यासाठी शहरातील मटण, चिकन, मासे, मासळी विक्री व खाद्यपदार्थाची दुकाने बंद ठेवणे अनिवार्य आहे. पालखी मार्गावरील व मुक्कामाच्या ठिकाणची मटण, चिकन, मासे व मासळी विक्रीची दुकाने दोन दिवस बंद ठेवण्याचा आदेश पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.9) दिला आहे. पालखी शहराच्या बाहेर जाईपर्यंत ती दुकाने बंद न ठेवल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हे ही वाचा : 

पैठण : श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे नाथांच्या वाड्यातून प्रस्थान

पिंपरी : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

Back to top button