Nashik Lasalgaon : पैशांसाठी मित्रांनीच केला मित्राचा घात, तपासादरम्यान गुन्हा उघड

Nashik Lasalgaon : पैशांसाठी मित्रांनीच केला मित्राचा घात, तपासादरम्यान गुन्हा उघड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अकस्मात मृत्यूची नोंद झालेल्या बाळासाहेब पोतले या इसमाचा खून झाल्याचे उघड झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १ जून रोजी वैशाली किशोर शिंदे या जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या असता बाळासाहेब पोतले हे दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी खिडकीत जाऊन बघितले असता ते झोपलेल्या स्थितीत दिसून आले. याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान पथकास घातपात झाल्याचा संशय आल्याने पोतले यांचे मित्र रामदास सालकाडे व सुनील मोरे (रा. विंचूर, ता. निफाड) यांचे मृताकडे दारू पिण्यासाठी वारंवार येणे-जाणे असायचे. परंतु पोतले हे मृत झाल्यापासून रामदास सालकाडे व सुनील मोरे गावातून निघून गेल्याचे तपास पथकास समजले. संशयित सालकाडे व मोरे यांचा शोध घेऊन विचारपूस केली असता दारू पिताना पैशांवरून वाद झाल्याने पोतले यास कॉटवरून लोटून दिल्याचे दोघांनी सांगितले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, योगेश शिंदे, प्रदीप आजगे, कैलास मानकर हे करत आहेत. 

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news