नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले बिनविरोध

नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले बिनविरोध
Published on: 
Updated on: 

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी देविदास पिंगळे, तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी शिवाजी चुंभळे गटाने अर्ज दाखल न केल्याने निवडणुक बिनविरोध झाली. त्यांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले.

बाजार समितीच्या विकासासाठी प्रामाणिक काम करणार असून ३० वर्षात प्रामाणिक काम केल्यामुळे सभासदांनी आम्हाला पुन्हा संधी दिली असल्याचे पिंगळे म्हणाले. तर आता भ्रष्टाचारमुक्त कारभार करा असे स्पष्ट सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू असे चुंभळे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा (रोहयो) उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news