पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, पिकअपच्या धडकेत १० मेंढ्या ठार | पुढारी

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, पिकअपच्या धडकेत १० मेंढ्या ठार

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे गावच्या हद्दीत पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रकला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पिकअपमधील तब्बल १० मेंढ्यां चेंगरून जागीच ठार झाल्या. ही दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ट्रक सिमेंटच्या विटा घेऊन संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने चालला होता. तो शनिवारी पहाटे डोळासणे गावच्या हद्दीत आला असता, मनमाड जिल्हा नाशिक येथून मेंढ्या घेऊन जाणारा पिकअप चालक समीर शेख याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरील विटांच्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पिकअपमधील १० मेंढ्या जागेवरच ठार झाल्या तसेच पिकअपच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात पिकअप चालक समिर शेख आणि रामा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Back to top button