नाशिक : सिडकोत समाजकंटकांकडून चारचाकी, दुचाकींची तोडफोड; दहशत माजविण्याचा प्रयत्न

सिडको (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : सिडकोतील सावतानगर, पवननगर भागात शुक्रवारी रात्री (दि.२७) अज्ञात समाजकंटकाकडून दुचाकी वर येत हातात कोयते सारख्या वस्तुने रस्त्यालगत असलेल्या चारचाकी कार, रिक्षा व दुचाकीच्या काचा फोडून दहशत निर्माण केल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सदर घटना सिसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे.
सिडकोतील सावता नगर भागातुन शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चार ते पाच समाजकंटक दोन दुचाकी वर बसुन हातात कोयत्या सारखे साहित्य घेऊन सावतनगर, रायगड चौक, पवननगर भागात रस्त्या लगत पार्किग केलेले चार चाकी कार, रिक्षा तसेच दुचाकीच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली.
या घटनेने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सदर घटनास्थळी अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख सह कर्मचारी दाखल होत सीसीटिव्हीच्या फुटेज वरून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला होता.
अधिक वाचा :
- नाशिक : इगतपुरीत गुटख्याने भरलेले दोन कंटेनर जप्त; एक कोटी २५ लाखाचा मुद्देमाल ताब्यात
- छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, वाहनावरिल ताबा सुटल्याने एकाचा मृत्यू
- Cameron Green : सूर्यकुमारसोबत फलंदाजी करणे सर्वात सोपे काम : ग्रीन